माजी विद्यार्थिनी अनिता बारवकर हिचे प्रेरणादायी मार्गदर्शनपर व्याख्यान
आज शाळेची माजी विद्यार्थिनी अनिता बारवकर हिचे इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी मार्गदर्शनपर व्याख्यान झाले .यामध्ये तिने विद्यार्थिनींना परिस्थिती कशीही असली तरी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही .शिक्षणानेच आपल्याला आपली परिस्थिती बदलता येते असे सांगितले. त्याचबरोबर जिद्दआणि कष्ट यांच्या जोरावर आपण यश मिळवू शकतो हे सांगून तिने विद्यार्थिनींना एकदम मोठे ध्येय ठरवण्यापेक्षा लहान लहान ध्येय ठरवत आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहचावे असे सांगितले. त्यासाठी तिने अनेक उदाहरणे दिली.तिचे मार्गदर्शनपर व्याख्यान विद्यार्थिनींना खूप आवडले.




