अभिजात मराठी गौरव दिन

कै.ध.रा.पोंक्षे सेवासदन सराव पाठशाळेत ‘अभिजात मराठी गौरव दिन ‘ अभिनव पद्धतीने साजरा

पुणे,दि: ५ ऑक्टोबर २०२६-
येथील पुणे सेवासदन संस्थेच्या सराव पाठशाळेत ‘ पालवी नर्चरिंग माईन्ड ॲन्ड बियॉन्ड ‘ या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना मराठी वाचनाची गोडी लागावी म्हणून बालसाहित्याची पुस्तके व वाचन साहित्य भेट देण्यात आले. त्यात शंभरहून अधिक पुस्तकांचा समावेश आहे. संस्थेच्या अध्यक्ष शोभा श्रीकांत, सहसंस्थापक सुधा भट,वर्षा काळे आदी मान्यवर या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सेवासदन प्रौढ प्राथमिकच्या विद्यार्थिनीही या कार्यक्रमात सहभागी झाल्या.


यावेळी विद्यार्थ्यांना बालकथांच्या माध्यमातून वाचनाचे महत्त्व सांगण्यात आले. शाळेत वर्षभर हा ‘ वाचन प्रकल्प ‘ चालणार असून मुलांच्या वाचनावर आधारित विविध स्पर्धांचे, उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. पाठशाळेच्या प्राचार्य डॉ. अश्विनी पालवणकर यांनी अतिथींचे स्वागत केले. शिक्षिका रंजना सोनवणे यांनी आभार व्यक्त केले तर डॉ.प्रिया निघोजकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षिका गीता जाधव व धनश्री ढुमे यांनी सहाय्य केले .

Scroll to Top