८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा
आज दिनांक १५/८/२०२६ रोजी भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कूल व कै.सौ.सुंदरबाई राठी हायस्कूल यांनी एकत्रितपणे मोठ्या उत्साहात साजरा केला. ध्वजारोहण इ. दहावी व बारावीच्या प्रथम आलेल्या तीन विद्यार्थिनींच्या हातून करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. राष्ट्रगीत , ध्वज गीत, राज्यगीत तसेच देशभक्तीपर गीत विद्यार्थीनींनी जोश पूर्ण वातावरणात सादर केली . तंबाखू मुक्त शपथ घेण्यात आली.कवायत प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती बोरसे मॅडम यांनी केले. दहावी बारावीच्या विद्यार्थिनी व पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी यांचा सत्कार श्रीमती बोळकवठेकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला .इ.दहावी , बारावीच्या विद्यार्थिनींने त्यांचे मनोगत व्यक्त केले.१५ ऑगस्टचा संदेश विद्यार्थीनींना श्रीमती खोमणे यांनी दिला.अशा प्रकारे प्रसन्न व मंगलमय वातावरणात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा संपन्न झाला.




