प्रवेशोत्सव
सोमवार दिनांक १५ जून २०२६ रोजी सेवासदन संस्थेच्या श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ प्राथमिक शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमास सेवासदन संस्थेचे सरचिटणीस श्री. पटवर्धन सर , शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष श्रीमती स्मिता फाटक मॅडम , संस्थेच्या सहसचिव श्रीमती अर्चना शहाणे मॅडम , पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता श्रीमती अर्चना नलावडे मॅडम , सेवासदन अध्यापिका विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य अश्विनी पालवणकर, शाळेच्या प्रमुख श्रीम अर्चना राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. श्रीम. स्मिता फाटक मॅडम आणि श्रीमती अर्चना नलावडे मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.फुग्यांची कमान, तसेच चंद्र, सूर्य यांच्या प्रतिमा असलेला सेल्फी कॉर्नर यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. विद्यार्थिनींचे फुलांच्या पाकळ्यांच्या वर्षावात औक्षण करून स्वागत करण्यात आले.
मा.अतिथींच्या हस्ते विद्यार्थिनींना नवीन पाठ्यपुस्तकांचे खाऊचे वाटप करण्यात आले. कै. ध. रा. पोंक्षे सेवासदन सराव पाशाळा, शिशु शाळा आणि श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ प्राथमिक शाळा या तीन विभागांचा एकत्रित प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.सहकारी शिक्षिका डॉ.प्रिया निघोजकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन केले. आशा दायमा, सुनीता मोहोळ यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.


