शैक्षणिक वर्षातील शाळेचा पहिला दिवस

नमस्कार
आज दिनांक १५/६/२०२६ रोजी श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कूल सेवासदन येथे २०२६-२०२७ शैक्षणिक वर्षातील शाळेचा पहिला दिवस हा  प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विश्राम बागवाडा क्षेत्रिय कार्यालय येथील नगरसेवक श्री उदय लेले होते.या कार्यक्रमासाठी संस्थेचे सरचिटणीस श्री चिंतामणी पटवर्धन सर, सहसचिव श्रीमती अर्चना शहाणे मॅडम उपस्थित होत्या.पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनींना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.अशा प्रकारे प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम हा मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात पार पडला.

Scroll to Top