प्रवेशोत्सव

सोमवार दिनांक १५ जून २०२६ रोजी सेवासदन संस्थेच्या कै. ध.रा. पोंक्षे सेवासदन सराव पाठशाळेच्या लहानग्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सेवासदन शिशुशाळा आणि रमाबाई रानडे प्रौढ प्राथमिक शाळेचाही प्रवेशोत्सव  यासोबतच झाला.
 कार्यक्रमास सेवासदन संस्थेचे सरचिटणीस श्री. पटवर्धन सर ,  शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष श्रीमती स्मिता फाटक मॅडम , संस्थेच्या सहसचिव श्रीमती अर्चना शहाणे मॅडम , पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता श्रीमती अर्चना नलावडे मॅडम , सेवासदन अध्यापिका विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य अश्विनी पालवणकर आदी मान्यवर  उपस्थित होते. लाडक्या विद्यार्थ्यांसाठी फुग्यांची कमान उभारली होती. तसेच चंद्र, सूर्य यांच्या प्रतिमा असलेला सेल्फी कॉर्नर सुद्धा बनवण्यात आला होता. विद्यार्थ्यांचे फुलांच्या पाकळ्यांच्या वर्षावात औक्षण करून स्वागत करण्यात आले.
मा.अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचे , खेळण्यांचे व खाऊचे वाटप करण्यात आले. चित्रकार तनिष्का निघोजकर हिने विद्यार्थ्यांचे केलेले फेस पेंटिंग, आनंददायी बालगीते यांमुळे प्रवेशोत्सवाचा सोहळा बहारदार झाला. शाळेतील सहकारी शिक्षिका डॉ.प्रिया निघोजकर यांनी कार्यक्रमाचे  नियोजन व सूत्रसंचालन केले . अर्चना भुजबळ, आशा दायमा, सुनीता मोहोळ यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
 
 
Scroll to Top