पालकसभा

 बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी शैक्षणिक वर्षातील पहिली पालक सभा संपन्न झाली.
इयत्ता पहिली ते चौथीचे बहुसंख्य पालक या सभेस उपस्थित होते.
सर्वप्रथम शाळेच्या शिक्षिका निघोजकर मॅडम यांनी सर्व पालकांचे स्वागत केले.
 त्यानंतर ज्येष्ठ शिक्षिका सोनवणे मॅडम यांनी सभेचे प्रास्ताविक केले तसेच शालेय शिस्त,  गणवेश , विद्यार्थ्यांचा आहार ,  वर्तणूक इत्यादी बाबींचे पालकांना मार्गदर्शन केले.
गीता जाधव मॅडम यांनी शाळेत वर्षभर घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, गुणदान पद्धती,  शैक्षणिक उपक्रम यांविषयी मार्गदर्शन केले. याच शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी ते चौथीचा अभ्यासक्रम बदलला आहे त्याविषयी निघोजकर मॅडम यांनी पालकांना माहिती दिली.
धनश्री ढुमे मॅडम यांनी शाळेत वर्षभर चालणारे सांस्कृतिक कार्यक्रम , माता पालकांचा शालेय शिक्षणातील सहभाग ,  विद्यार्थी सुरक्षा याविषयी मार्गदर्शन केले.
सभेच्या शेवटच्या टप्प्यात या शैक्षणिक वर्षासाठी नवीन पालक प्रतिनिधी म्हणून  सौ. पूनम शेवाळे, रसिका रोकडे,  कल्याणी तिकोने, विनय जाधव आणि अमोल निगडे या पालकांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
शिक्षिका धनश्री ढुमे यांनी सर्वांचे आभार मानले.

चहापानाने सभेची सांगता झाली .

Scroll to Top