हिंदी दिवस

नमस्कार
आज श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कूल सेवासदन पुणे येथे हिंदी दिवस हा कार्यक्रम साजरा करण्यात आला .या कार्यक्रमासाठी विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालय येथील शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षक श्रीमती सुमंत बगाड मॅडम तसेच संस्थेच्या सह सचिव श्रीमती अर्चना शहाणे मॅडम या उपस्थित होत्या . दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली . हिंदी दिनानिमित्त  विद्यार्थीनींनी हिंदी सुविचार, पहेली, चुटकुले, देशभक्ती पर गीत, आणि नृत्य इ . चे सादरीकरण केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व हिंदी दिवसाचे महत्त्व श्रीमती खोमणे मॅडम यांनी सांगितले .पाहुण्यांनी विद्यार्थ्यांनींना प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले व छान असे गाणे म्हणून दाखविले सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन इ .दहावीच्या विद्यार्थिनींने केले .अशा पद्धतीने हिंदी दिवस आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला.

Scroll to Top