शिक्षक वृंद

खोमणे निलम कुंडलिक (प्र.मुख्याध्यापिका )

शिक्षण : एम.ए .बी .एड. डी.एस.एम.

सेवेचा कालावधी : २७ वर्ष

पुरस्कार 

  • पुणे महापालिकेचा आदर्श पुरस्कार, १५ऑगस्ट २०१६
  • पुणे लोकशाही आघाडी चा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार ५ सप्टेंबर २०१९
  • शिवाजी फाऊंडेशन चा शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी बद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार

मेघना मुरलीधर देव (सहाय्यक शिक्षिका )

शिक्षण : बी.एस सी.,बी.एड., एम्.एड., डी.एस.एम.

सेवेचा कालावधी : २४ वर्ष

इयत्ता १० वीला गेली २३ वर्ष विज्ञान विषयाचे अध्यापन केले आहे.
तसेच SSC बोर्डात गेली २३ वर्ष‌‌‌ आधी परीक्षक आणि नंतर नियामक म्हणून काम केले.
कोरोना काळातही BLO म्हणून उत्तम रितीने काम केले असे प्रशस्तीपत्र प्राप्त.

मृणालिनी कानिटकर जोशी (सहाय्यक शिक्षिका)

शिक्षण : बी.एस सी., बी.एड, एम्.ए. (मराठी), हिंदी पंडित

कार्यवाह : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे

सेवेचा कालावधी : २० वर्षे

पुरस्कार 

  • पुणे महानगरपालिका आदर्श शिक्षक पुरस्कार, १५ ऑगस्ट २०१६
  • पुणे सेवासदन संस्था आदर्श शिक्षक पुरस्कार, २ ऑक्टोबर २०१६
  • साहित्य कला संवर्धन मंडळ आदर्श शिक्षक पुरस्कार २०१७
  • भाजप कोथरूड मतदार संघ शिक्षक गुण गौरव सन्मान ५ ऑक्टोबर २०२१

साहित्यसेवा : सीमंतिनी हा कवितासंग्रह प्रकाशित. या कवितासंग्रहास खालील पुरस्कार प्राप्त 
१) विवेकानंद प्रतिष्ठान पुणे यांचा पहिला स्वर्गीय डॉ. अरविंद लेले काव्यपुरस्कार
२) गदिमा प्रतिष्ठान पुणे यांचा आम्ही गदिमांचे वारसदार हा पुरस्कार
३) इतिहास संशोधन मंडळ संगमनेर यांचा कवी अनंत फंदी पुरस्कार
४) स्वा. सावरकर स्मृती समिती पुणे यांचा स्वा. सावरकर काव्य पुरस्कार
५) लळित रंगभूमी पुणे यांचा लळित साहित्य पुरस्कार
६) मुस्लिम साहित्य परिषदेचा आबेदा इनामदार कवयित्री पुरस्कार
७) राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि राष्ट्रीय बंधुता प्रतिष्ठान, पुणे यांचा लोकगायक प्रल्हाद शिंदे पुरस्कार
८) नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचा आम्ही नारायण सुर्वे यांचे वारसदार हा पुरस्कार
९) साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे यांचा काव्यदीप पुरस्कार
१०) प्रेरणा आर्ट फाऊंडेशन पुणे यांचा काव्यमग्न पुरस्कार
★अखिल ब्राह्मण महासंघाचा(पुणे केंद्र) डॉ. सुमती बेलवलकर स्मृती पुरस्कार मराठी भाषेतील योगदानासाठी ३०जुलै २०२२
★महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गेय कविता लेखनाच्या संपूर्ण कारकिर्दीसाठी कवी ना.घ.देशपांडे पुरस्कार २०२२
★ रंगत संगत प्रतिष्ठान, पुणे यांचा उत्कृष्ट प्रेमकवी पुरस्कार १४ फेब्रुवारी २०२३
★ गेली ३४ वर्षे महाराष्ट्रात, तसेच महाराष्ट्रा बाहेर दिल्ली, कोलकता, बंगलोर येथे काव्यवाचनाचे अनेक कार्यक्रम सादर. पुणे फेस्टिवल, यशवंतराव चव्हाण स्मृती प्रतिष्ठान, भैरूरतन दमाणी पुरस्कार, इत्यादी प्रतिष्ठित कार्यक्रमांमध्ये सहभाग.

★सीमंतिनी, हे जीवन सुंदर आहे व झुलत शब्द झुला ह्या स्वरचित कवितांच्या वाचन व गायनाच्या कार्यक्रमांचे सादरीकरण. मानस कलामंच या यू ट्यूब चॅनेल द्वारे वेगवेगळ्या साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन.
★आकाशवाणी व दूरदर्शनवर विविध कार्यक्रमांचे लेखन व सादरीकरण.
★विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व सूत्रसंचालन.
★विशेष उल्लेख : बालभारती इयत्ता सातवीच्या मराठी पाठ्यपुस्तकात (२०१७) ‘माझी मराठी ‘ही कविता समाविष्ट.

अनुपमा निखिल बिराजदार (सहाय्यक शिक्षिका)

शिक्षण : एम.ए. [इंग्लिश], बी.एड.[इंग्लिश, भूगोल]

सेवेचा कालावधी : १३ वर्षे

पुरस्कार 

  • सेवासदन संस्थेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित (वर्ष २०२३)

शारदा गोरक्ष धनवळे (सहाय्यक शिक्षिका)

शिक्षण : डी.एड, बी.ए. (हिंदी), बी.एड. (हिंदी, इतिहास)

सेवेचा कालावधी : ३६ वर्षे

पुरस्कार 

  • पुणे महानगरपालिका आदर्श शिक्षक पुरस्कार २६ जानेवारी २०१६
Scroll to Top