मराठी राजभाषा दिन

२७फेब्रुवारी २०२६रोजी प्रशालेत मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सेवासदन संस्थेचे सरचिटणीस श्री. पटवर्धन सर व प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती खोमणे मॅडम यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक श्रीमती शारदा धनवळे यांनी केले, मराठी राजभाषा दिन कवी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्म दिवशी साजरा करण्यात येतो. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. प्रशालेतील विद्यार्थिनीअंजू रोकडे हिने मराठी भाषा दिनाचे महत्त्व सांगीतले, इयत्ता ६वी च्या विद्यार्थिनींनी मले बाजाराला जायचं बाई हे नाट्यवाचन सादर केले तसेच ८वी व ९वी च्या विद्यार्थिनींनी कुसुमाग्रज, शांता शेळके, बहिणाबाई चौधरी, नारायण सुर्वे, मंगेश पाडगावकर व प्रशालेतील शिक्षिका श्रीमती मृणालिनी जोशी यांच्या कविता सादर केल्या, ८वी च्या विद्यार्थिनींनी मराठी भाषेची घोषवाक्ये सर्व विद्यार्थीनींकडून म्हणवून घेतली. प्रमुख पाहुण्यांचे व मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन पर भाषण झाले.सर्व विद्यार्थीनींनी उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शारदा धनवळे यांनी केले .
Scroll to Top