दिवाळी पहाटचा कार्यक्रम

नमस्कार
आज गुरुवार दिनांक १६/१०/२०२५ रोजी श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कूल सेवासदन मध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालय शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षक श्रीमती सुमंत बगाड मॅडम उपस्थित होत्या . दिपप्रज्वलन व सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . शिक्षक व विद्यार्थीनींनी दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व सांगितले . त्यानंतर विद्यार्थीनींनी समूहगीत व समूह नृत्य सादर केली . इ.सहावीची ज्योती सकपाळ व नववीची लक्ष्मी चौहान हिने गाणं सादर केले . तसेच शाळेतील शिक्षिका श्रीमती जोशी मृणालिनी यांनी त्यांची स्वतःची कविता सादर केली .दिवाळी पहाटच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थीनींनी छान रांगोळ्या काढल्या . तसेच पणत्यांची आरास छान केली होती.पणत्यांचे स्वस्तिक सुंदर काढले होते . पावसाळा ,भुईचक्र, फुलबाज्या उडवून दिवाळीचा आनंद घेतला.अशा पद्धतीने आनंदात व उत्साहपूर्ण वातावरणात दिवाळी पहाटचा कार्यक्रम संपन्न झाला.
Scroll to Top