मुख्याध्यापिकांचा संदेश
खोमणे निलम कुंडलिक
शिक्षणाला वयाची अट नसते. तुम्ही कोणत्याही वयामध्ये शिक्षण घेऊ शकता. या उक्तीप्रमाणे आमची श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कूल ही सेवासदनची एक शाखा आहे.आमच्या शाळेमध्ये वय वर्षे १४ ते पुढे ६० व्या वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत आहेत.आमची ही शाळा महाराष्ट्रातील एकमेव शाळा आहे. आमच्या शाळेला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
आमच्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनींचा वर्ग हा मुळातच वयाने मोठा, शिक्षणामध्ये जास्त अंतर असणारा म्हणजे दहा, पंधरा, वीस वर्षाच अंतर असते. तसेच त्या संसार प्रंपच सांभाळून, छोटे -मोठे काम करून, अनेक समस्यांना तोंड देऊन उत्साहाने शाळेत येत असतात. यामागे त्यांची शिक्षणाविषयी असणारी ओढ, जिद्द आणि चिकाटी दिसून येते. आम्ही शाळेत वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमातून आणि उपक्रमातून त्यांचा आत्मविश्वास वाढवत असतो.
त्यांच्यामध्ये येणारी नकारात्मकता काढून सकारात्मकता निर्माण करत असतो. त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी वेगवेगळ्या व्याख्यात्यांचे मार्गदर्शन ठेवत असतो.
विद्यार्थिनींनो तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये खचून न जाता जिद्दीने येणाऱ्या संकटांना सामोरे जा. नेहमी सकारात्मक विचार करा तसेच ज्या स्त्रियांनी अनेक अडचणींवर मात करून आपले जीवन सुकर बनवण्याचा प्रयत्न केला आहे अशा स्त्रियांचा आदर्श घ्या, त्यांचे आत्मचरित्र वाचा.
