



उपक्रम
प्रौढ स्त्री प्रशाला वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवत असते. ज्यामध्ये विद्यार्थिनींना शैक्षणिक समृद्धी बरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळते. तसेच त्यांची कला-कौशल्ये विकसित होतात.
सुविधा
प्रौढ स्त्री हायस्कूल मध्ये विद्यार्थिनींसाठी विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा शैक्षणिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी योजना राबविल्या जातात.
कार्यक्रम
प्रौढ स्त्री हायस्कूल संपूर्ण शैक्षणिक वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करते, ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांचा अनुभव समृद्ध करणे, समुदायाची भावना वाढवणे आणि यश साजरे करणे.
आमची दृष्टी आणि ध्येय
संकल्प
प्रौढ स्री हायस्कूल ही एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था बनण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, ते जबाबदार, कल्पक सर्जनशील व सहृदय नागरिक म्हणून विकसित व्हावे ह्या साठी शाळा प्रयत्नशील असते.
ध्येय
शिक्षणापासून वंचित राहिलेल्या महिलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणणे, स्वावलंबी बनवणे व आयुष्यभर शिक्षणाची आवड निर्माण करणे,
विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा

अनुभवसंपन्न शिक्षक

उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण

सामाजिक बांधिलकीची जाणीव

अभ्यासपूरक उपक्रम

आश्वासक वातावरण

सक्षम नेतृत्व
श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्री हायस्कूल विषयी
श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्रियांचे हायस्कूल ही पुण्यात मध्यवस्तीत भरणारी, प्रौढ महिलांना शिक्षण देणारी शाळा.
२० व्या शतकात स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या शिक्षणव्रती श्रीमती रमाबाई रानडे यांनी शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी २ ऑक्टोबर १९०९ रोजी पुणे सेवासदन ह्या संस्थेची स्थापना केली. आणि तेव्हापासून प्रौढ स्त्री शिक्षणाचे हे कार्य निरलसपणे चालू आहे.
आनंददायी अध्ययन व अध्यापन
